राधिका-गुरु-शनायाच्या केमिस्ट्रीने गाठला मोठा ट्प्पा, मालिकेचे ९०० भाग पुर्ण

By  
on  

‘माझ्या नव-याची बायको’ असं काहीसं हटके नाव असलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर बराच काळ राज्य केलं आहे. या मालिकेने आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मालिकेने नुकताच ९०० भागांचा टप्पा पुर्ण केला आहे. या मालिकेतील गुरुनाथ सुभेदार म्हणजेच अभिजीत खांडकेकरने सोशल मिडियावर ही बाब शेअर केली आहे. नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंड पुरुन उरणारी खमकी राधिका म्हणजेच अनिता दाते प्रेक्षकांना आवडली आहे. 

 

टीआरपी रेंटिंगमध्येही सर्वात जास्त काळ टॉपवर राहण्याचा मानही या मालिकेने मिळवला होता. या मालिकेत अनेक चढ उतार आले. अनेकदा सोशल मिडियावर मालिकेच्या प्लॉटची खिल्ली देखील उडवली गेली. तरीही या मालिकेचा चाहता वर्ग अफाट आहे. मध्यंतरी शनाया साकारत असलेली रसिका सुनील हिने मालिकेतून एक्झिट घेतली. त्याजागी आलेल्या इशा केसकर हिनेही शनायाच्या पात्राचं बेअरिंग उत्तम पकडत रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे. सध्या मालिकेत गुरुनाथ अपघातानंतर स्मृती गेल्याचा अभिनय करत आहे. पण शनाया अनेकदा त्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघांचीही खेळी यशस्वी ठरते की राधिका यांचं कारस्थान उघड करते हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share