गुरुनाथचे दिवस आता भरले ! राधिका घडवणार चांगलीच अद्दल

By  
on  

झी मराठीवरील ‘माझ्या नव-याची बायको’ ही टीआरपीच्या स्पर्धेत कायमच अव्वल राहिलेली मालिका आहे. आजवर चांगल्या वृत्तीच्या राधिकाला अनेक प्रकारे गुरुनाथने त्रास दिला आहे. राधिकानेही धीराने या सगळ्याचा सामना करत स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे.

 

या मालिकेत आता एक रंजक वळण आलं आहे. स्मृतीभंश झालेल्या गुरुनाथ राधिकाला शेतक-यांचे चोरीला गेलेले पैसे परत देऊन विश्वास संपादन्याच्या प्रयत्नात असतो. पण राधिकाला त्याचा संशय आला आहे हे त्याच्या गावीही नसतं. अशा वेळी राधिका गुरुनाथला चांगलीच अद्दल घडवते.

पण यावेळी राधिका एकटी नसणार तर तिच्यासोबत अनेक बायकाही असणार आहेत. या बायका मिळून त्याला चांगलाच धडा शिकवतील तसेच त्याची धिंडही काढतील. यावेळी सतत सर्वांना फसवणारा गुरुनाथ राधिकाला फसवू शकणार नाही. त्यासोबत राधिका शनाया आणि तिच्या आईला काय शिक्षा देते हे लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share