By  
on  

पाहा स्टार प्रवाहवरील विठुमाऊली मालिकेत विठ्ठल आणि रुक्मिणीचा अलौकिक विवाहसोहळा

स्टार प्रवाहावरील ‘विठू माऊली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. रसिकांनी या मलिकेवर पहिल्यापासून अतुट प्रेम केलं आहे. या मालिकेत विठठ्ला आणि त्याच अवतार कार्य दाखवण्यात आलं आहे. भगवान विष्णूंची विठ्ठ्ल रुपात येण्यापासून ते पंढरपुर श्रीक्षेत्र बनण्यापर्यंत या मालिकेने रसिकांच्या मनावर चांगलीच मोहिनी घातली.

या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत विठ्ठलाच्या भूमिकेत आहे. एकता लबडे ही रखुमाईच्या भूमिकेत आहे. आता या मालिकेत विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यामध्ये विठुरायाच्या नरसिंह, खंडोबा, राम, विष्णू आणि १२ बलुतेदार रुपांचंही दर्शन घडणार आहे. साक्षात विठ्ठल रखुमाईचा विवाहसोहळा अनुभवणं ही प्रेक्षकांसाठी अनोखी संधी म्हणता येईल. त्यासाठी पाहायला विसरु नका विठुमाऊली सोमवार ते रविवार रात्री ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर

Recommended

PeepingMoon Exclusive