नुकतीच 'झी मराठी'वर सुर झालेली 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील सुमन उर्फ सुमी या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने सुमी हे पात्र साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे.
मराठी टीव्ही तसेच सिनेसृष्टीत अभिनयाची छाप उमटवणारी अमृता ही मुळची कोल्हापुरची असुन पुण्यात तिचा जन्म झाला.
पुण्यातील सदाशिव पेठेतील रेणुका स्वरुप महिला शाळेतुन अमृताने शालेय शिक्षण पुर्ण केले.
तसेच भारती विद्यापीठ, पुणे येथुन तिने बाॅटनीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली.
अमृताने कथक या नृत्यप्रकाराचं रितसर शिक्षण घेतलं आहे.
कथक शिकतानाच मित्रांच्या सांगण्यावरुन अमृताचा कल अभिनयाकडे झुकला.
प्रकाश पवार दिग्दर्शित 'मिथुन' या सिनेमातुन अमृताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
परंतु सध्या सुरु असलेल्या 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेमुळे अमृताला ख-या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.
महाराष्ट्र सरकारने भोर येथे दादा कोंडके चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत अंधांचे क्रिकेट सामने आयोजीत केले होते. या सामन्यांना अमृताची विशेष उपस्थिती होती.
'मिसेस मुख्यमंत्री' मालिका तसेच अन्य विविध माध्यमातुन अभिनेत्री अमृता धोंगडेच्या करियरचा आलेख उंचावत राहो ही पिपिंगमुनमराठीतर्फे शुभेच्छा