By  
on  

'अगंबाई सासूबाई'मध्ये चाललीये मंगळागौरीची तयारी, शुभ्रासोबत सासूबाईही होणार का सहभागी?

सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात व्रतवैकल्य तर असतातच. पण नव्या सासुरवाशिणींना मंगळागौरीचे वेध लागतात. त्यामुळे डेलीसोपमध्येही मंगळागौरींची तयारी सुरू नसेल तर नवलच! अगंबाई सासूबाईमधील कुलकर्ण्यांच्या घरातही मंगळागौरीची तयारी सुरु आहे.

आसावरी शुभ्राच्या हातात तिच्या मंगळागौरीच्या गाण्याच्या वह्या देते आणि दाते काकूंकडे मंगळागौरीला जायला सांगते आणि तिच्यावेळी साज-या होत असलेल्या मंगळागौरीची आठवणही सांगते. त्यावेळी शुभ्रा तिला येण्याविषयी सुचवते. पण तिचा चेहरा पडतो. अशावेळी शुभ्रा तिला कुलकर्ण्यांच्या घरात मंगळागौर करण्याविषयी सुचवते. यावर आसावरीही तिला होकार देते. त्यामुळे अगंबाई सासूबाईच्या पुढील भागात शुभ्राच्या मंगळागौरीची धमाल रसिकांना अनुभवण्यास मिळेल यात शंका नाही. अगंबाई सासूबाई या मालिकेने अल्पवधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवल्याचं दिसून येत आहे. मागील महिन्यात ही मालिका टॉप रेटिंगमध्ये देखील होती.

मागील महिन्यात झी मराठीची ही मालिका टॉप रेटिंगमध्ये देखील होती. अगंबाई सासूबाई सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता रसिकांच्या भेटीला येते.

Recommended

PeepingMoon Exclusive