आईची गुरु-शनायाशी सुरु असलेली जवळीक त्यांना टाकेल का संकटात?

By  
on  

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत दररोज एक नवीन ट्वीस्ट येताना दिसत आहे. गुलमोहर सोसायटीत पुन्हा एकदा शनाया आणि गुरु राहायला आले आहेत. त्यामुळे राधिकावर सुड उगवण्यासाठी शनाया रोज नवे नवे फंडे आजमावताना दिसत आहे. शनायाने आता नव्या घराची वास्तूशांत केली आहे. त्यासाठी तिने सोसायटीमधील सगळ्यांना बोलवलं होतं.

 

त्यात गुरुनाथच्या आईलाही बोलवलं होतं. खरं पाहता शनाया-गुरुकडे जाण्यास राधिका आणि तिच्या सास-यांचा विरोध असतो. यावरून यापुर्वी त्यांच्या घरात वाद झालेला असतो. तरीही गुरुची आई यावेळी गुरुकडे सत्यनारायणाच्या प्रसादाला जाते. त्या प्रसाद घेऊन येतात. त्याच वेळी सोसायटीमधील काकू त्यांना याबद्दल विचारतात. गुरुच्या बाबांनाही हे समजतं. ते गुरुच्या आईला बाहेर निघून जाण्यास सांगतात. ते आईला घर सोडून जाण्यास सांगतात. आता आई कुठे जाणार? गुरु शनाया त्यांना घरात घेणार का? याची उत्सुकता वाढली आहे.

Recommended

Loading...
Share