By  
on  

टीआरपी रेटिंगमध्ये ‘राजा आणि अंजली’च्या केमिस्ट्रीची बाजी, ही मालिका पाचव्या स्थानावर

मराठी मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाही. पण असं असलं तरी टीआरपीच्या स्पर्धेत मात्र खुप कमी मालिका दिसतात. आताही टीआरपी रेटिंगमध्ये ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सर्वात वरचं स्थान मिळवलं आहे. या मालिकेत राजा राजगोंडाची एंट्री मालिकेचा टीआरपी रेट वर नेण्यास कारणीभूत ठरली आहे.

यात राजा आणि अंजलीची केमिस्ट्री देखील रसिकांना आवडत आहे. याशिवाय कायम एक नंबरवर असलेल्या ‘माझ्या नव-याची’ बायको या मालिकेची मात्र दुस-या स्थानी घसरण झाली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका यात स्वत:चं स्थान कायम ठेवून आहे. तर चला हवा येऊ द्या हा कथाबाह्य कार्यक्रम यात चौथ्या स्थानी आहे. पाचव्या स्थानावर मिसेस मुख्यमंत्री ही मालिका आहे. समर आणि सुमीचच्या लग्नाचा करिष्मा या मालिकेच्या रेटिंगला वर नेऊ शकला नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive