By  
on  

रात्रीस खेळ चाले 2: पाटकरांना बसणार सगळ्यात मोठा धक्का, समोर येणार हे गुपित

रात्रीस खेळ चाले मालिकेत आता शेवंताने सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे. इतके दिवस आण्णांच्या प्रेमात वेडी झालेली शेवंता आता भानावर आली आहे. त्यामुळेच आण्णांसोबतच नातं संपवण्याचा तिने निर्णय घेतला आहे. पण आण्णा सहजसहजी हे नातं तिला संपवू देणार नसल्याचं सांगतात. यावर शेवंता पाटणकरांसमोर केलेल्या पापांची कबुली देणार असल्याचं सांगते.

 

पण यावर आण्णा म्हणतात, तु पाटणकरांना सांगू शकणार आहेस का, की सुषमा आण्णा नाईकांची मुलगी आहे.’ हा सगळा संवाद पाटणकर खिडकी आडून ऐकत असतात. सुषमा त्यांची मुलगी नाही हे ऐकताच त्यांना धक्का बसतो. आता आण्णा आणि शेवंताच्या नात्यावर पाटणकरांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Recommended

PeepingMoon Exclusive