राधिका-सौमित्रच्या नात्यावर गुरुची नजर, आणणार का नवीन विघ्न?

By  
on  

माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत आता एक वेगळंच वळण येताना दिसत आहे. इतके दिवस गुरु शनायाच्या कपटीपणाच्या अनुभवानंतर आता सौमित्र आणि राधिकामध्ये गोड नात्याची सुरुवात होताना दिसत आहे. राधिकाची संकटातून सुटका झाल्यानंतर सौमित्र तिला घेऊन मंदिरात जातो. तिच्यासाठी त्याने नवस बोलला असतो. एकीकडे राधिका आणि सौमित्रचं मन जुळत असताना गुरुनाथ तिथे पोहोचतो.

 

राधिका आणि सौमित्रला एकत्र मंदिरात जाताना पाहून गुरु चिंताग्रस्त दिसतो. मंदिरात गुरुजी सौमित्र आणि राधिकाला सुखाने संसार करा असा आशिर्वादही देतात. काय असेल राधिका-सौमित्रच्या नात्याचं भवितव्य? गुरुनाथ-शनाया राधिकाला त्रास देण्यासाठी कोणती नवी खेळी खेळतील हे समजण्यासाठी मात्र ‘माझ्या नव-याची बायको’ ही मालिका पाहावी लागेल.

Recommended

Loading...
Share