‘देशी संसारात विदेशी तडका’ झी मराठीवर सुरु होतीये ही नवी मालिका

By  
on  

परदेशातून शिकून आलेला मुलगा सगळ्यांना भेटी आणतो. पण स्वत:साठी मात्र ‘वेडिंगची बायको’ आणतो. नेमकं असंच काहीसं नाव आहे झी मराठीवरील नवीन मालिकेचं. झी मराठीवर ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' ही नवी मालिका सुरु होणार आहे. ही मालिका कोणत्या मालिकेच्या जागी येणार हे देखील समोर आलं आहे. प्रेक्षकांची लाडकी ‘ तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

 

राणा आणि अंजलीच्या केमिस्ट्रीला रसिकांनी पसंती दर्शवली. राणा अंजलीच्या आयुष्यातील चढ उतार किंवा आनंदाचे क्षण प्रेक्षकांनी अनुभवले. पण आता लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' ही मालिका 21 ऑक्टोबरपासून या मालिकेची जागा घेणार असल्याचं समोर आलं आहे. आता प्रेक्षक या नव्या मालिकेला कितपत स्विकारतात ते लवकरच कळेल.

Recommended

Loading...
Share