By  
on  

'स्वराज्यजननी जिजामाता' टीमतर्फे राजमाता जिजाऊंना अनोखी मानवंदना

'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत त्या ऐतिहासिक सप्तपदीची चाहुल लागली आहे. या मालिकेत सध्या महत्वाचा टप्पा आपण पाहत आहोत. तो म्हणजे जिजा-शहाजींचा शाही विवाह सोहळा. या विवाहाचा प्रत्येक विधी याची देही याची डोळा प्रत्येक मराठी प्रेक्षक पाहत आहे. या विवाह सोहळ्याचे सोनेरी क्षण मनात साठवत असतानाच सोनी मराठीने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

रयतेचा राजा घडवणारी राजमाता जिजाऊ जिथे जन्मली, खेळली-बागडली, जिथे जिजाऊ आणि शहाजींच्या विवाहाची बोलणी झाली त्या बुलढाण्यातल्या सिंदखेडमध्ये असणाऱ्या जिजाऊंच्या मुर्तीला सोनी मराठीकडून मनमोहक फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे. सोनी मराठीतर्फे जिजाऊंना ही मानवंदना देण्यात आली आहे.

हा उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या त्या थोर मातेविषयी सोनी मराठीने आपला आदर व्यक्त केला आहे. या मालिकेत सप्तपदीचे क्षण जसे जवळ येऊ लागले तशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांना सोनी मराठीवर 'स्वराज्यजननी जिजामाता' ही मालिका पाहून या विवाहसोहळ्याचे साक्षीदार प्रेक्षकांना होता येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive