By  
on  

आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वांची कहाणी उलगडणार 'सावित्रीजोती' मधून, हे कलाकार प्रमुख भूमिकेत

स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. या निमित्ताने सोनी मराठीने 'ज्योती सावित्री' मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. प्रोमो पासूनच या मालिकेविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

सोनी मराठीने आजवर अनेक उत्तमोत्तम मालिका रसिकांच्या भेटीला आणल्या आहे. राजमाता जिजाऊंनंतर आता सोनी मराठी पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जीवन गाथा पडद्यावर आणणार आहे.  या मालिकेत सावित्रीबाई फुले आणि जोतीबा फुले यांची भूमिका कोण साकारणार याचा उलगडा झाला असून अभिनेता ओमकार गोवर्धन महात्मा फुलेंची आणि अभिनेत्री अश्विनी कासार सावित्रीबाईंची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथिदिनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांना विनम्र अभिवादन करून सोनी मराठी घेऊन येत आहे त्यांच्या आयुष्यावर आधारित नवी मालिका 'सावित्रीजोती' — आभाळाएवढी माणसं होती #सावित्रीजोती | #SavitriJoti #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati @ninadvaidya @dashami_official @ashwinikasar18 @omkargovardhan

A post shared by Sony मराठी (@sonymarathi) on

सावित्रीबाई फुलेंचं स्त्री शिक्षणाबाबत असलेलं योगदान अमुल्य आहे. सावित्रीबाईंच्या या प्रवासाला साथ होती ती जोतीबा फुलेंची. या ध्येयाने झपाटलेल्या जोडप्याची कथा सहा डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार ७.३० वाजता 'ज्योती सावित्री' मालिकेच्या माध्यामातून रसिकांना पाहायला मिळणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive