हे कलाकार झळकणार नवी मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’मध्ये

By  
on  

छोट्या पडद्यावर सध्या मालिकांची गर्दी वाढलीय. मात्र या सगळ्यांमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्त्व निर्माण करण्याचा प्रयत्न आगामी मालिका करत आहेत. यातच एका नव्या मालिकेचं नाव चर्चेत आलं आहे. सहकुटुंब सहपरिवार पाहता येईल अशी ही मालिका आहे. अर्थात मालिकेच नावच ‘सहकुटुंब सहपरिवार’ असं आहे. नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करणारे सुप्रसिद्ध कलाकार सुनील बर्वे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर आत्तापर्यंत विविध नाटक, सिनेमांमधून जिच्या अभिनयाच कौतुक झालय अशी अभिनेत्री नंदीता धुरी या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. दोघही पहिल्यांदाच या मालिकेच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसतील. सरिता आणि सत्यजीत अशी या दोन्ही पात्रांची नावं आहेत. कुटुंबाच्या सुखासाठी या दोघांनी केलेला त्याग हा विषयावर ही मालिका आहे.  

ज्या प्रसिद्ध वाहिनीवर सुनील बर्वे ही मालिका करत आहेत या वाहिनीसोबत काम करण्याची त्यांची ही तिसरी वेळ हे. आणि या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी सुनील बर्वे पुन्हा छोट्या पडद्यावर पाहायला मिळतील. याविषयी सुनील बर्वे सांगतात की, “सहकुटुंब सहपरिवारमध्ये सत्यजीत ही भूमिका साकारतो आहे. अतिशय विनम्र आणि मवाळ असं हे पात्र आहे. आताच्या घडीला बरेच जण विभक्त कुटुंबाकडे वळत असताना एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व पटवून देणारी ही मालिका आहे.'


अनेक मालिकांच्या गर्दीत ही मालिका वेगळेपण सिद्ध करतेय की नाही हे मालिका प्रदर्शित झाल्यावर समोर येईलच.

Recommended

Loading...
Share