By  
on  

पाहा लोककलांच्या उत्सवात लावण्यवतींच्या बहारदार लावणींची पर्वणी

 'जय जय महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपूर्ण लोककलांची उजळणी होत आहे. या आठवड्यात अशाच एका नखरेल लोककलेचा नजराणा प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. ठसकेबाज ठेक्यावर डुलवणारी अशी ही लावणी या आठवड्यात आपल्या भेटीला येणार आहे. ठसकेबाज लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. ढोलकीची साथ, घुंगुरांचे बोल आणि दिलखेचक अदांचे हे मिश्रण. या लावणीमध्ये एक वेगळी ओढ, नजाकत, काव्यमय रचना पाहायला मिळते, जिच्या ताकदीवर ही लावणी गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालते आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने लावण्यवती मिनाक्षी पोशे ही 'कसं काय पाटील' आणि 'डार्लिंग डार्लिंग' या ऊर्मिला धनगर यांच्या आवाजातील गाण्यांवर लावणी सादर करतील; तर जान्हवी प्रभू-अरोरा यांनी सादर केलेल्या 'लटपट लटपट, मला लागली कुणाची उचकी, छबीदार छबी, ज्वानीच्या आगीची मशाल' या गाण्यांवर अभिनेत्री प्राजक्ता माळीची पावले थिरकणार आहेत. सणांचं वर्णन असणाऱ्या 'तीळगूळ घ्या, दसरा गेला, सख्या चला बागामंदी' या अमृता नातू यांनी गायलेल्या गाण्यांवर अभिनेत्री स्मिता तांबे नृत्य सादर करणार आहे, तर 'किती ठुमकत ठुमकत, विंचू चावला' या गाण्यांवर वैशाली जाधव यांचे नृत्य पाहता येणार आहे. 'पुण्याची मैना, मला म्हणत्यात हो लवंगी' या गाण्यांवर लावणीक्वीन ऐश्वर्या बडदे, तर 'कुन्या गावाचं आलं पाखरू, नाचू किती नाचू किती, पतंग उडवीत होते' या गाण्यांवर अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने नृत्य सादर केले आहे. 'कोरा माल' आणि 'रंगा रंगा रंगा' या गाण्यांवर लावण्यवती प्रमिला लोदगेकर यांच्या नृत्याची झलक पाहता येणार आहे. एकंदर या आठवड्यातील लोककलांच्या उत्सवात लावण्यवतींच्या अदा पाहता येणार आहेत.

दर आठवड्याला लोककलांचा लोकोत्सव साजरा होत असलेल्या 'जय जय महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमावर या आठवड्याला चढणार आहे लावण्यांचा साज. तेव्हा या अनोख्या मैफलीची रंगत अनुभवण्यासाठी नक्की पाहा, 'जय जय महाराष्ट्र माझा'. सोमवार - मंगळवार रात्री ९ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive