By  
on  

Coronavirus : ‘‘वैजू नंबर वन’ मालिकेतून होणार जनजागृती, प्रसारित होणार विशेष भाग

कोराना या जीवघेण्या आजाराने सध्या जगभर धुमाकूळ घातलाय. कोरोना हे नाव जरी नुसतं ऐकलं तरी जीवाचा थरकाप उडतो. मात्र योग्य ती काळजी आणि सुचनांचं पालन केलं तर या जागतिक संकटावर आपण मात करु शकतो हाच सकारात्मक संदेश देण्यात येणार आहे स्टार प्रवाहवरील ‘वैजू नंबर वन’ या मालिकेतून. खरतर या मालिकेने पदार्पणातच जोरदार धडक मारली आहे. पहिल्याच आठवड्यात दमदार ओपनिंग मिळालेल्या या मालिकेचे हलके फुलके विषय प्रेक्षकांना आवडत आहेत. कोरोनाचं संकट, नोकरीतलं टेन्शन आणि धकाधकीच्या आयुष्यात ही मालिका विसाव्याचे क्षण घेऊन आलीय अश्याच प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आहेत.

टेलिव्हिजन हे अत्यंत प्रभावी माध्यम असल्यामुळे कोरोना आजाराविषयी असणारे समज गैरसमज आणि त्याचा सामना कसा करायचा हे मालिकेतून मांडण्याचं आव्हान स्टार प्रवाहवरील वैजू नंबर वनच्या टीमने घेतलं आहे. या मालिकेत वैजूची भूमिका साकारणारी सोनाली पाटील या विशेष भागाविषयी सांगताना म्हणाली, कोरोना पासून वाचण्यासाठी सध्याच्या घडीला घरात राहणं आणि सरकारी सुचनांचं पालन करणं हेच आपल्या हातात आहे.  अश्या परिस्थितीत मनोरंजनाच्या माध्यमातून कोरोनविषयी  जनजागृती करण्याची संधी मिळणं ही वैजू नंबर वन च्या संपूर्ण टीम साठी मोठी गोष्ट आहे. हातात सहज आलेल्या टेक्नॉलॉजी चा वापर अफवा पसरवण्यासाठी न करता योग्य ज्ञान पोहोचवण्यासाठी करावा हा मोलाचा संदेश ‘वैजू नंबर वन’च्या या विशेष भागातून दिला जाणार आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. एकत्र मिळून या जागतिक संकटाशी लढूया हे मालिकेतून सांगणार असल्याची प्रतिक्रियाही सोनाली पाटीलने व्यक्त केली.

त्यासाठी पाहायला विसरु नका वैजू नंबर वन दररोज रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive