‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिकाही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

By  
on  

सध्या लॉकडाउनमुळे सगळ्या प्रकारचं चित्रीकरण बंद आहे. शुटिंग बंद असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकारही घरीच आहेत. यातच काही जुन्हा प्रसिद्ध मालिका या निमित्ताने टेलिव्हिजनवर पुन्हा पाहायला मिळत आहेत. रामायण, महाभारत या प्रसिद्ध ऐतिहासिक पौराणिक मालिका पुन्हा टेलिव्हिजनवर सुरु करण्यात  आल्या आहेत. शिवाय प्रेक्षकांच्या आवडत्या आणखी काही मालिका प्रसारित व्हाव्यात अशी प्रेक्षक सोशल मिडीयावर मागणी करत आहेत. 


त्यातच आता मराठी टेलिव्हिजन विश्वात प्रसिद्ध असलेली स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिकाही प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या न्यूज पोर्टलच्या माहितीनुसार येत्या 30 मार्चपासून ही मालिका पुन्हा सुरु होत असल्याचं वृत्त आहे. दुपारी 4 ते 8 या वेळेत ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. प्रेक्षकांमध्ये या मालिकेविषयीची आवड आणि पसंती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. 


 शिवाय छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या निमित्ताने पुन्हा एकदा घरात बसलेल्या मंडळींना कुटुंबासोबत एकत्र बसून पाहण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. 

Recommended

Loading...
Share