By  
on  

पाहा Video : बाळूमामा साकारणारा हा अभिनेता गाणं गात जात्यावर दळतोय गहू 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर लॉकडाउन असताना मनोरंजन विश्वाचं कामही थांबलय. त्यामुळे सिनेमा, मालिका, नाटक, वेब सिरीज या सगळ्याची कामं थांबली आहेत. म्हणूनच कला विश्वातील कलाकार सध्या घरातच आहेत. घरात बसून त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी या निमित्ताने त्यांना मिळाली आहे. सतत चित्रीकरणात व्यस्त असलेले हे कलाकार या संधीचा पुरेपरु वापर करत आपल्या परिवारासोत वेळ घालवत आहेत आणि वेळेचा सदुपयोग करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जात्यावर दळायला बसल्यावर गायला लागतंय म्हणली माझी आज्जी, म्हणुन हे .. जुनी लोक २-३ पायल्या दळण कस दळत असतील, शेरभर गहू दळून घाईला आलो .. पण चांगला अनुभव होता तुम्ही पण असच घरी थांबुन आपल्या दारावर जे संकट आलय ते परतुन लावा. #stayhomestaysafe #workoutfromhome #nogymnoproblem #bicepworkout #shoulderworkout @colorsmarathiofficial @balumamachyanavanchangbhal @balu_mamachya_navan_official

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale) on

सोशल मिडीयाच्या माध्यमातून घरात बसलेले हे कलाकार काय काय करत आहेत हे पाहायला मिळतय. कुणी फोटोच्या माध्यमातून तर कुणी व्हिडीओच्या माध्यमातून सध्या ते घरात बसून काय करत आहेत किंवा घरात बसून कशी काळजी घ्यायला हवी याविषयीचं आवाहान करत आहेत. 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मराठी मालिकेतील अभिनेता सुमीत पुसावळे हा देखील त्याच्या परिवारासोबत घरी आहे. नुकताच त्याने सोशल मिडीयावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत सुमीत जात्यावर दळणा दळताना दिसतोय शिवाय गाणही गातोय. यावेळी सुमीतची आज्जीसुद्धा सोबत दिसतेय. यावेळी जात्यावर दळायचा अनुभव सुमीतने सांगीतला.

या पोस्टमध्ये सुमीत लिहीतो की, “जात्यावर दळायला बसल्यावर गाला लागतंय म्हणली माझी आज्जी, म्हणून हे.. जुनी लोक 2-3 पायल्या दळण कस दळत असतील, शेरभर गहू दळून घाईला आलो.. पण चांगला अनुभव होता. तुम्ही पण असच घरी थांबुन आपल्या दारावर जे संकट आलय ते परतुन लावा.”
 

Recommended

PeepingMoon Exclusive