By  
on  

Lockdown असलं म्हणून काय झालं...'माझा होशील ना'ची टीम येणार तुमच्या भेटीला

रिफ्रेशींग नायक-नायिकेच्या जोडीला तगडी स्टारकास्ट अशी 'माझा होशील ना' मालिकेचा साग्रसंगीत मनोरंजनाचा बेत झी मराठीवर अल्पावधीतच रसिकांना आवडू लागला. तर मालिकेचं शिर्षक गीत हे मालिकेचं विशेष आकर्षण ठरलं  सई-आदित्य या जोडीसोबतच आदित्यला तळहाताच्या फोडासारखे जपणारे चार मामा यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पण आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. तर देशभरात पंतप्रधान मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

आता सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. तर मालिका, सिनेमे यांचंही चित्रिकरण बंद आहे. 'माझा होशील ना' ही मालिका अलिकडेच सुरु झाली होती. काहीच भाग प्रसारित झाले होते, तो करोनाचं संकंट ओढवलं . त्यामुळे रसिकांना आता विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे यांची केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता लागली आहे. म्हणूनच ते तुम्हाला भेटायला येतायत...पण कसे हा प्रश्न साहजिच उद्भवतो. 

'माझा होशील ना' च्या इन्स्टाग्राम पेजवरुन टीम रसिकांच्या भेटीला येतेय. हे एखाद्या वेबएपिसोडप्रमाणे असतील. पहिल्या भागात सई-आदित्य व नैना यांना पाहायाला मिळणार आहे.  या सर्वांची ही घरातून सुरु असलेली केमिस्ट्री सर्वांना नक्की आवडेल यात शंका नाही. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive