काही मालिकांवर प्रेक्षक इतके प्रेम करतात की त्या मालिकांमधील भूमिका त्यांना खऱ्या वाटू लागतात. 'माझ्या नवऱ्याची बायको' या मराठी मालिकेलाही प्रचंड प्रसिद्धी आणि पसंती मिळाली. या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांंचं प्रेम मिळतयं. त्यातलीच एक आहे अभिनेत्री ईशा केसकर. या मालिकेत ईशा शनायाची भूमिका साकारते.
ईशाने नुकताच तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ईशा लिहीते की, "शनू बेबीला मिस करताय का ?" ईशाने ही पोस्ट टाकताच चाहत्यांनी प्रश्नाला उत्तर म्हणून होय अशा कमेंट्स केल्या आहेत. सध्या लॉकडाउनमुळे सर्व प्रकारचे चित्रीकरण थांबले आहे. शिवाय मालिकांचेही रिपीट भाग प्रसारित होत आहेत. यातच चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा आढावा घेण्यासाठी ईशाने ही पोस्ट केली असावी. मात्र ईशा साकारत असलेल्या शनाया ही भूमिका प्रेक्षकांना किती आवडते हे यावरुन पाहायला मिळतय.
सोशल मिडीयावर ईशा केसकरचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. शिवाय तिच्या फोटोंवरही लाईक्सचा वर्षाव होत असतो. सध्या लॉकडाउनमध्ये ईशादेखील तिच्या घरातच आहे.