By  
on  

श्री पुन्हा भेटला त्याच्या आयांना, असं केलं व्हर्च्युअल गेट टुगेदर

‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका आणि त्याचे भाग प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देऊन गेले. प्रेक्षकांची ही आवडती मालिका आणि यातील कलाकार याविषयी आजही त्यांना कुतुहल आहेच.
मात्र नुकतीच या कलाकार मंडळींचं गेट टुगेदर झालं आहे. मात्र लॉकडाउनमुळे हे व्हर्च्युअल गेट टुगेदर होतं. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून या कलाकारांनी एकमेकांशी संवाद झाला आहे. नुकतच शशांक केतकरने एक फोटो  पोस्ट करत याविषयी सांगीतलं आहे. या पोस्टमध्ये तो लिहीतो की, “ ’होणार सून मी ह्या’ घरचीचं व्हर्चुअल गेट टुगेदर, लीना भागवत आणि मंदार देवस्थळी यांची खूप आठवण आली. खूप छान आठवणी आणि धन्यवाद सगळ्यांचे.”

या व्हिडीओ कॉलमध्ये लीना भागवत आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी नसल्याने त्यांना या कलाकारांनी मिस केलं आहे. पण या निमित्ताने मालिकेतला 'श्री' हा त्याच्या आयांना पुन्हा भेटलाय असं म्हणायला हरकत नाही. यावेळी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठारे, पूर्णिमा तळवळकर, सुहिता थत्ते  आणि शशांक केतकर यांनी व्हिडीओ कॉलवर गप्पा मारल्या. या व्हिडीओ कॉलमध्ये मालिकेच्या जुन्या आठवणींना या कलाकारांनी उजाळा दिला असेल एवढं नक्की.

या कलाकारांना या फोटोत एकत्र पाहून या मालिकेचे चाहते सुखावले असतील एवढं नक्की. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive