By  
on  

पाहा Video : लॉकडाउनच्या आधी सेटवर हा कलाकार अशी करायचा धमाल

कोरोनाग्रस्त परिस्थितीत सध्या लॉकडाउनमुळे विविध क्षेत्रांना फटका बसला. त्यातच मनोरंजन विश्वाचं कामही ठप्प झाल. यात कलाकार घरात बसून त्यांचं काम प्रचंड मिस करत आहेत. 
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील कलाकारांनाही त्यांच्या सेटची आठवण येत आहे. या मालिकेतील कलाकार राज हंचनाळे देखील त्याच्या शुटिंगच्या आठवणी मिस करतोय. नुकताच त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

हा व्हिडीओ या मालिकेतील प्रचाराच्या सीन दरम्यानचा आहे. यावेळी अंजली वहिनीच्या प्रचारा नंतरच्या सीन शूट केल्यानंतर कलाकारांनी अशी मजा केली होती. या पोस्टमध्ये राज लिहीतो की, “लॉकडाउन अगोदरचं आयुष्य, अंजली वहिनीचा प्रचार करुन झाल्यावर.”
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. आणि हा व्हिडीओ पाहुन या मालिकेची आठवण येत असणाऱ्या आणि मालिका पाहण्यासाठी आसुसलेले असणाऱ्या प्रेक्षकांना हा व्हिडीओ नक्कीच आवडला असेल यात शंका नाही. 

लवकरच मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तेव्हा चित्रीकरणाच्या आठवणीत रमलेले हे कलाकार लवकरच त्यांच्या सेटवर बऱ्याच दिवसांनी पोहोचतील तेव्हा तो क्षण त्यांच्यासाठी नक्कीच खास असेल.
 

Recommended

PeepingMoon Exclusive