नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'सुंदरा मनामध्ये भरली' असं मालिकेचं नाव

By  
on  

लॉकडाउनच्या काळात टेलिव्हिजनवर जुन्या मालिका, मालिकांचे जुने भाग या गोष्टी सुरु आहेत. त्यातच लॉकडाउनच्या आधी चित्रीत झालेल्या आणि लॉकडाउननंतर चित्रीत होत असलेल्या मालिकांच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. या नव्या मालिकांमध्ये एका वेगळ्या विषयावर मालिका येत आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली'  असं या नव्या मालिकेचं नाव आहे.

कलर्स मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरच येणार असल्याचे प्रोमो प्रदर्शित झाले आहेत. एक अंगाने जाड असलेली मुलगी, जिला लग्नासाठी नकार येतात मात्र ती अशा व्यक्तिच्या शोधात आहे जी व्यक्ति तिच्या वजनापेक्षा तिच्या मनाचं सौंदर्य पाहील. हा सुंदर विषय घेऊन ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अभिनेत्री अक्षया नाईक ही मुख्य भूमिका साकारत आहे. नुकताच या नव्या मालिकेचा नवाकोरा प्रोमा प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

Recommended

Loading...
Share