By  
on  

‘फ्रेशर्स’ आले परत, पुन्हा नव्याने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'फ्रेशर्स' या मालिकेने काही वर्षांपूर्वी तरुणाईला वेड लावलं होतं. तरुणाईसाठी असलेली ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. शिवाय मालिकेत असलेल्या उत्तम कलाकारांच्या फळीने चांगलं काम केलं होतं. 
आता हेच फ्रेशर्स पुन्हा भेटीला येत आहे. सध्या झी युवा वाहिनीवर या मालिकेचेच जुने एपिसोड तर सुरुच आहेत. मात्र या मालिकेतील हे कलाकार पुन्हा नव्याने भेटीला येत आहेत. तर चक्क लॉकडाउनमध्ये हे फ्रेशर्स भेटीला येत आहेत. या मालिकेतील कलाकार हे सध्या घरीच आहेत. त्यामुळे घरात राहूनच त्यांनी प्रेक्षकांसाठी काहीतरी चित्रीत केलं आहे. आणि हेच प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार आहे. नुकतच या मालिकेतील कलाकारांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये या नव्या ‘फ्रेशर्स’चा प्रोमो पाहायला मिळतोय

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आपण यांना पाहिलत का? पाहिलंय? मग ओळखलंत का? तुम्ही आमच्यावर केलेल्या भरभरून प्रेमामुळेच पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येतोय.....नव्याने.... या कठीण काळात तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. बघा कसा वाटतोय. लवकरच घेऊन येत आहोत lockdown मधले Freshers. पण आता काही Freshers राहिलेलो नाही बरं का आम्ही. .. मग काय घडतंय आत्ता नक्की? जाणून घेण्यासाठी थोडीशी वाट बघा... येतोय लवकरच... तोपर्यंत झी युवा वर Freshers मालिका सुरू आहेच. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ५.३० वा. Keep watching and keep the love coming!️ #freshers #freshersreturn #zeeyuva #friendsforever #quarantinelife @zeeyuva @rasikavengurlekarofficial @shubhankar_tawde @onkar_raut @mitalimayekar @khwabeeda_amruta @rashmianpat @siddharthkhirid @sanjaysjadhav @deerane @dreamers_pr @aashishpathre

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta) on

या पोस्टमध्ये ते लिहीतात की, “आपण यांना पाहिलत का? पाहिलंय? मग ओळखलंत का? तुम्ही आमच्यावर केलेल्या भरभरून प्रेमामुळेच पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला येतोय..नव्याने..या कठीण काळात तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय. बघा कसा वाटतोय. लवकरच घेऊन येत आहोत.लॉकडाउनमधले फ्रेशर्स. पण आता काही फ्रेशर्स राहिलेलो नाही बरं का आम्ही.मग काय घडतंय आत्ता नक्की? जाणून घेण्यासाठी थोडीशी वाट बघा.. येतोय लवकरच.”तेव्हा नव्याने भेटीला येणारे हे ‘फ्रेशर्स’ कलाकार सध्या इंडस्ट्रीत फ्रेशर्स नसले तरी त्यांना पुन्हा नव्याने पाहणं रंजक ठरेल एवढं नक्की.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive