By  
on  

म्हणून इशा केसकरने ठोकला 'माझ्या नव-याची बायको'ला राम राम, पाहा Video

जय मल्हार या गाजलेल्या मालिकेतील  बानूबया म्हणून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री  इशा केसकर हिच्या कारकिर्दीला नवी ओळख मिळाली ती झी मराठीवरच्याच  'माझ्या नव-याची बायको' मालिकेमुळे. रसिका सुनिलने एका उंचीवर नेऊन ठेवलेली शनू बेबी तिने मालिका सोडल्यानंतर इशाने आपल्या हटके स्टाईल मधून प्रेक्षकांसमोर उभी केली. इशाने अल्पावधितच नवी शनाया म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं.तिची स्टाईल रसिकांना खुप आवडली.

आता लॉकडाऊननंतर लवकरच आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहायला मिळणार म्हणून चाहते उत्सुक असतानाच नुकतीच एक दणका देणारी बातमी मिळाली. ती म्हणजे नवी शनाया जाऊन पुन्हा आधीची जुनी शनाया येणार त्याच ढंगात.म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल चाहत्यांच्या भेटीला येणार. ही जरी आनंदाची वार्ता असली तरी , नेमकं इशा  केसकर ही मालिका का सोडते हा प्रश्न सर्वांनाच सतावू लागला. सर्वत्र याच चर्चा रंगू लागल्या.  म्हणूनच मग या व्हिडीओद्वारे इशाने खास चाहत्यांसाठी स्पष्टीकरण दिलं आहे. 

इशा म्हणते, "लॉकडाऊननंतर सेटवर परतायला मी खुपच उत्सुक होते. मलासुध्दा तुम्हाला भेटायची इच्छा आहे. माझ्या सेटवरच्या सर्व सहकलाकारांना आणि टीमला भेटण्यासाठी मी आतुरते, पण काय करणार ह्या हेल्थ इश्यूमुळे मला आत्ता शूटींग करणं शक्य नाही, म्हणूनच शो मस्ट गो ऑन......मी सर्वांना खुप मिस करणार हे मात्र नक्की. पण लवकरच नवं काहीतरी घेऊन तुमच्या भेटीला नक्कीच येईन."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#IshaKeskar #Shanaya #OneLastTime #MazhyaNavryachiBayko #MNB #ZeeMarathi #ThankYou #Grateful #SeeYouSoon

A post shared by ISHA KESKAR (@ishackeskar) on

प्रेक्षकांची आवडती 'माझ्या नवऱ्याची बायको' हि मालिका देखील प्रेक्षकांच्यालवकरच भेटीस येईलच, आणि हो त्यासोबतच जुनी शनाया पण परत येतेय बर का....असो....इशा केसकरला तिच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive