गेली तीन महिने ठप्प झालेलं मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाचं काम नुकतच सुरु झालं आहे. विशेषकरून मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. बऱ्याच दिवसांनी चित्रीकरण सुरु झाल्याने कलाकारही आनंदी आहेत. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत विविध नियमांचं पालन करत हे चित्रीकरण केलं जात आहे. सेटवर सोशल डिस्टंसिंगसह विविध गोष्टींची दक्षता घेतली जात आहे.
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. आणि या मालिकेच्या सेटवरही सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे. नुकताच या मालिकेच्या वाहिनीने अर्था झी मराठीने एक व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओत या मालिकेच्या सेटवर कशी काळजी घेतली जात आहे हे दाखवलं गेलय. येत्या 13 जुलैपासून या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या व्हिडीओच्या पोस्टमध्ये असं लिहीलं गेलय की, "शक्य तितकी सर्व काळजी घेऊन मंडळी चित्रीकरणाचा श्री गणेशा झालेला आहे. "अग्गंबाई सासूबाई" १३ जुलैपासून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला."
गेल्या काही महिन्यांपासून टेलिव्हिजनवर मालिकांचे जुने भाग आणि जुन्या मालिका प्रसारित केल्या जात होत्या. मात्र आता काही वाहिन्यांवर मालिकांचे नवे भाग पाहायला मिळणार आहेत.