By  
on  

चित्रीकरण सुरु झाल्यावर विराजसला या गोष्टीचा होत आहे त्रास

मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला आता हळूहळू सुरुवात झाली आहे. विशेषकरून काही मालिकांचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. माझा होशील ना या मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. तब्बल तीन महिन्यांनंतर सेटवर पुन्हा काम करण्याचा उत्साह या मालिकेच्या टीमचा आहे. कलाकारही पुन्हा कामावर रूजू झाल्याने आनंदी आहे.

या मालिकेत अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे मुख्य भूमिकेत आहेत. मात्र सेटवर चित्रीकरण सुरु झाल्यावर विराजसला एका गोष्टीचा त्रास होत आहे. सेटवर विविध सुरक्षिततेची काळजी घेत नियमांचे पालन केलं जात आहे. मग यात मास्क आणि फेश शिल्डही वापरल्या जात आहेत. याच फेस शिल्डमुळे विराजसला खाताना अडचण येत आहे. आणि असाच एख विनोदी व्हिडीओ विराजसने पोस्ट केला आहे. असं असलं तरी या सगळ्या गोष्टींची काळजी विराजससह सेटवरील सर्व टीम घेत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Setवरचा नवीन problem...

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13) on

 

विराजसने पोस्ट केलेला हा मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीयावरील त्याच्या फॉलोवर्सना चांगलाच आवडला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive