By  
on  

  मालिकेच्या सेटवर राणादा अशी घेत आहे काळजी, असे पाळले जात आहेत नियम

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉक़डाउनमुळे जवळपास तीन ते चार महिने मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद होतं. मात्र सरकारच्या परवानगीनंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे काही मालिकांचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचही कोल्हापुरात चित्रीकरण सुरु करण्यात आलं आहे. 
या मालिकेच्या सेटवर सगळ्या प्रकारची विशेष काळजी घेतली जात आहे. सोशल डिस्टंसिंग पासून इतर नियमांचे पालन केले जात आहे. राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी ही या सेटवर चित्रीकरणासाठी पोहोचला आहे.

झी मराठी वाहिनीने नुकताच या मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रदर्शित केला आहे. या व्हिडीओत या सेटवर कशाप्रकारे काळजी घेतली जात आहे हे पाहायला मिळत आहे. हार्दिकही यात सगळ्या गोष्टी दाखवत आहे. 
इतके दिवस या आणि इतर मालिकांचे जुने भाग आणि इतर जुन्या मालिका प्रसारित करण्यात आल्या होत्या. मात्र आता लवकरच मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
 

Recommended

PeepingMoon Exclusive