By  
on  

समीर-विशाखाची भन्नाट केमिस्ट्री हसून हसून पुरेवाट लावायला पुन्हा येतेय!

समीर-विशाखा  ही जोडी म्हटलं की नुसते हास्याचे फवाारे उडणार ह्याची शंभर टक्के गॅरण्टी प्रेक्षकांना असते. ही जोडी नेहमीच काहीतरी भन्नाट आणि अफलातून सादरीकरण करुन चाहत्यांची मनं जिंकते. त्यांचा परफॉर्मन्स म्हटलं की, सर्व टेन्शन विसरुन आपण त्यांच्या हास्यजत्रेत सामिल होणार ह्यात तिळमात्रही शंका नाही. 

दरम्यान लॉकडाऊनमध्ये, प्रेक्षकांनी समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार या हास्यविरांना प्रचंड मिस केलं. पण त्यांचे जुने एपिसोड्स पाहूनसुध्दा प्रेक्षकांना तितकीच मजा आली. पण आता चिंता नसावी, समीर-विशाखाची जोडी येतेय पुन्हा तुम्हांला हसवायला!. नवी एनर्जी आणि भरपूर धम्माल घेऊन येत्या १३ जुलैपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

 

आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला सुरुवात झाल्याने समीर-विशाखा प्रचंड खुश असल्याचं सेटवर पाहायला मिळतंय. त्यांच्या स्किट परफॉर्मन्स ते स्वत:सुध्दा खुपच एन्जॉय करतात. 

 

प्रेक्षकांसोबतच  परिक्षकसुध्दा नेहमीच समीर-विशाखा जोडीच्या परफॉर्मन्सला भरभरुन दाद देतात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive