By  
on  

मराठी मनोरंजन उत्सवाचं होणार नव्या जोशात शुभारंभ

टेलिव्हीजन विश्वात आता लवकरच मनोरंजन उत्सवाला सुरुवात होत आहे. जवळपास तीन ते चार महिने टेलिव्हीजनवर कोरोनाग्रस्त परिस्थितीतील लॉकडाउनमुळे जुने कार्यक्रम, मालिकांचे जुने भाग प्रसारित होत होेते. मात्र आता येत्या 13 जुलैपासून प्रेक्षकांना पुन्हा त्यांचे आवडते कार्यक्रम, मालिका आणि त्यांचे नवे भाग पाहता येणार आहेत.

सरकारच्या निर्णयानंंतर नुकतीच मालिका विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नियमांचं पालन करून, सुरक्षिततेची काळजी घेऊन हे चित्रीकरण करण्यात येत आहे.त्यामुळे आता या मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे, कार्यक्रमांचेही नवे भाग आता येत्या 13 जुलैपासून पाहता येणार आहेत. आणि हा दिवस मराठी मनोरंजनाचा उत्सव म्हणून हे कलाकार साजरा करणार आहेत. यासाठी प्रेक्षकांनाही हे कलाकार हा दिवस दिवे लावून, रांगोळ्या काढून, देवाला नमन करून, तोरणं लावून साजरा करण्याचं ते आवाहन करत आहेत. 

 

तेव्हा मनोरंजनाचा हा उत्सव प्रेक्षकांसाठी आणि या कलाकारांसाठी खास ठरेल यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive