शनाया आणि आसावरी दोघीही बदलल्यात, आता दिसणार त्यांचं हे नवं रुप

By  
on  

जवळपास तीन महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका नव्या भागांसह भेटीला येत आहेत. यात 'माझ्या नवऱ्याची बायको' आणि 'अग्गंबाई सासूबाई' या दोन्ही लोकप्रिय मालिकाही भेटीला येत आहेत.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत आता शनाया परतली आहे. म्हणजेच या मालिकेत सुरुवातीपासून अभिनेत्री रसिका सुनील शनायाच्या भूमिकेत होती. मात्र नंतर अभिनेत्री ईशा केसकरने ही भूमिका साकारली. मात्र आता तीन महिन्याच्या कालवधीनंतर शनाया पुन्हा बदलली आहे. रसिका सुनीलची पुन्हा शनाया म्हणून एन्ट्री झालेली या नव्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता ही परतलेली शनाया कशी असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेत बबड्याची आई म्हणजेच आसावरी यांचही बदललेलं रुप पाहायला मिळणार आहे. कारण बबड्याची आई त्याच्यासोबत सासूसारखं वागणार आहे. 

 

तेव्हा या दोन्ही भूमिकांचं हे बदललेलं रुप पाहणं मजेशीर ठरणार आहे. झी मराठीने नुकत्याच प्रदर्शित केलेल्या नव्या प्रोमोमध्ये या दोघींचं बदललेलं रुप पाहायला मिळतय. यात लिहीलय की, "शनाया आणि आसावरी दोघीही बदलल्यात आता येणार गोष्टींमध्ये खरी गंमत."

हीच गंमत आता येत्या 13 जुलैपासून अनुभवता येणार आहे. 

Recommended

Loading...
Share