By  
on  

सुरक्षित जागी सुरु आहे या मालिकेचं चित्रीकरण, 2 वर्षांनी पुन्हा सेटवर आल्याने शनाया आनंदी

'माझ्या नवऱ्याची बायको'च्या सेटवर परतली शनाया, सेटवर अशी घेत आहे काळजीटेलिव्हीजन विश्वातील चित्रीकरणाला नुकतीच हळूहळू सुरुवात झाली आहे. आणि आता येत्या 13 जुलै पासून प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग त्यांच्या भेटीला येणार आहेत. 
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या चित्रीकरणालाही नुकतीच सुरुवात झाली आहे. या मालिकेतील नव्या भागांमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री रसिका सुनीलनंतर अभिनेत्री ईशा केसकर शनायाची भूमिका साकारत होती. मात्र ईशाच्या आजारपणामुळे ईशाच्या जागी पुन्हा रसीकाचं शनाया म्हणून आगमन झालं आहे. तेव्हा आधीची शनाया या सेटवर पुन्हा परतली आहे. 

झी मराठी वाहिनीने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओत राधिका, शनाया आणि गुरु पाहायला मिळत आहेत. ते सध्या सुरु असलेल्या चित्रीकरणा विषयी सांगत आहेत. एका सुरक्षित ठिकाणी विशेष काळजी घेऊन या मालिकेचं चित्रीकरण केलं जात असल्याचं हे कलाकार सांगतात. शिवाय शनाया म्हणजेच रसिका तब्बल दोन वर्षांनी सेटवर पुन्हा आल्याने प्रचंड आनंदी असल्याचं या व्हिडीओत सांगते.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive