पाहा Photos : 'राजा राणीची गं जोडी' मालिकेच्या चित्रीकरणाला अशी करण्यात आली सुरुवात

By  
on  

शासनाच्या नियमांचे पालन करून बऱ्याच मराठी मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. काही मालिकांचे तर नवे भागही प्रसारीत करण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या काळात टेलिव्हीजनवर मालिकांचे जुने भाग आणि जुन्या मालिकांचे पुन:प्रसारण करण्यात आलं होतं. मात्र आता चित्रीकरण सुरु झाल्याने प्रेक्षकांना टेलिव्हीजनवर नव्या भागांची मेजवानी अनुभवायला मिळतेय.

'राजा राणीची गं जोडी' या प्रसिद्ध मालिकेच्याही चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. तेव्हा विविधं नियमांचे पालन करून,सेटवर काळजी घेऊन हे चित्रीकरण सध्या सुरु आहे. सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करून हे कलाकार सेटवर चित्रीकरण करत आहेत. शिवाय सेटवर डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

कलर्स मराठी वाहिनीने या मालिकेच्या सेटवरील काही क्षणचित्रे सोशल मिडीयावर पोस्ट केली आहेत. यात असं म्हटलय की, "शासनाच्या नियमांचे आणि Social Distancing चे पालन करून आणि सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याबाबत योग्य ती दक्षता बाळगून सुरू झालेल्या #RajaRanichiGaJodi या तुमच्या आवडत्या मालिकेच्या चित्रीकरणाची काही क्षणचित्रे." या मालेकेच कलाकार सेटवर पुन्हा चित्रीकरणासाठी पोहोचल्यावर आनंदी दिसत आहेत. तीन ते चार महिन्यांच्या ब्रेकनंतर पुन्हा चित्रीकरणासाठी हे कलाकार सज्ज झाले आहेत.

तेव्हा लवकरच या राजा राणीची कहाणी नव्या भागांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'राजा राणीची गं जोडी' या मालिकेचे नवे भाग येत्या 21 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

 

Recommended

Loading...
Share