By  
on  

'प्रेम पॉयजन पंगा' मधील महत्त्वाच्या कलाकारांना कोरोनामुळे सोडावी लागली मालिका

कोरोनाग्रस्त परिस्थितीतील  लॉकडाउन मुळे  कोठारे विजनच्या  'प्रेम पॉइजन पंगा' या झी युवावरील मालिकेतील दोन अतिशय महत्वाच्या पात्रांना या कोरोना चा एक भलमोठा टैक्स द्यावा लागला आहे . या प्रतिभावान कलाकारांना कोरोनामुळे चक्क मालिकाच सोडावी लागली आहे . या मालिकेतील मालतीची भूमिका साकारणारी इरावती लागू आणि कैलास भोळे यांची भूमिका साकारणारे स्वप्नील राजशेखर हे कलाकार सध्या या मालिकेत दिसत नाहीत आणि पुढे दिसणारही नाहीत.

 हे दोन्ही कलाकार ज्या भागात राहतात, ते कोरोनाचे हॉटस्पॉट्स घोषित करण्यात आले होते.  जेव्हा शूटिंग सुरु झाली तेव्हा , या भागातून बाहेर पडून, चित्रीकरणात सहभागी होणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे होते . त्यांच्या कुटुंबांच्या आणि अर्थातच मालिकेतील टीमच्या आरोग्याकरिता त्यांनी स्वताहूंन घेतलेला हा त्यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. झी युवा वाहिनी आणि कलाकार यांच्या परस्पर सामंजस्यातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

निर्माते महेश कोठारे याविषयी म्हणतात की, "आपले सहकलाकार यापुढे सेटवर नसणार याचे दुःख संपूर्ण टीमला झाले. अर्थात हे दोघे जण साकारत असलेल्या भूमिका अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे, या दोघांच्या अनुपस्थितीमुळे मालिकेच्या कथानकात अडथळा निर्माण होणारच होता. त्यामुळेच नाईलाजाने या भूमिका साकारण्यासाठी नव्या कलाकारांना आमंत्रित करण्यात आले. अभिनेत्री रसिका धामणकर आणि अभिनेता शेखर फडके हे यांना यापुढे या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दिसतील . सर्वांच्या हितासाठी, इतका मोठा निर्णय घेतलेल्या या कलाकारांविषयी कोठारे विजन आणि झी युवा वाहिनीला नक्कीच अभिमान आहे."

तर ही मालिका सोडण्याविषयी बोलताना अभिनेता स्वप्नील राजशेखर म्हणाले की, "28 जूनला मी कोल्हापूरहुन मुंबईकडे रवाना होणार होतो. मात्र माझ्या इमारतीत 3 कोविड रुग्ण सापडल्यामुळे, इमारत सील करण्यात आली. पुढील 14 दिवस मला घरातच क्वारंटाईन होणं भाग होतं. किमान 3 जुलैपर्यंत मी चित्रीकरणासाठी पोचणे आवश्यक होते. हे शक्य नसल्यामुळे चित्रीकरणात अडचण निर्माण होणार होती. मी साकारत असलेली कैलास भोळे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, कथानकात बदल करणे शक्य नव्हते. म्हणूनच सर्वांच्या हितासाठी मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात माझा मित्र शेखर फडके ही भूमिका साकारणार आहे, याचा आनंद आहे. त्याला आणि मालिकेच्या पुढील वाटचालीला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा"

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive