जुनी शनाया परत आल्याने माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत नव्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. एकीकडे राधिका आणि शनायाची मैत्री झाली आहे आणि दोघी गुरुला धडा शिकवण्यासाठी एकत्र आल्या आहेत. तर दुसरीकडे ऑफस्क्रिन या दोघी फोटोसाठी पोझ देतात आणि गुरुच म्हणजेच अभिजीत खांडकेकर त्यांचे फोटो क्लिक करताना दिसतोय.
आधीची शनाया म्हणजेच रसिका सुनील पुन्हा एकदा या मालिकेत शनाया म्हणून परतली आहे. रसिकाने मधूनच मालिका सोडली होती आणि तिच्या जागी अभिनेत्री ईशा केसकर शनाया साकारत होती. मात्र आता रसिका परत आल्यानं राधिका मात्र आनंदी झालेली पाहायला मिळतेय. राधिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनिता दाते केळकरने नुकताच रसिकासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो क्लिक केला आहे अभिनेता अभिजीत खांडकेकरने. मालिकेच्या सेटवर साडी नेसून नटलेल्या शनाया आणि राधिकाचा हा फोटो आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनिता लिहीते की, "ती परत आलीय.." असं म्हणत तिने शनायाचं स्वागत केलं आहे.
बऱ्याच कालवधीनंतर या मालिकेचे नवे भाग पुन्हा प्रसारित करण्यात आले आहेत. शिवाय लॉकडाउनमुळे बऱ्याच कालावधीनंतर या मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाल्याने मालिकेतील कलाकारही आनंदी आहेत.