By  
on  

पाहा Photos : शेवंता बनली नवरी, अण्णा नाईकांशी लग्न करून नाईक वाड्यात प्रवेश करणार शेवंता

नव्या भागांसह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'ऱात्रीस खेळ चाले 2' मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये बरेच ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. 

कारण अण्णा आणि शेवंताचं आता लग्न होतय. आणि लग्न करून  शेवंता नाईक वाड्यात प्रवेश करणार आहे. मालिकेला मिळालेलं हे विलक्षण वळण आता पाहणं रंजक ठरणार आहे. या खास सीनसाठी शेवंता साकारणारी अपूर्वा नेमळेकर साडी आणि दागदागिने घालून नटलेली पाहायला मिळतेय. सोशल मिडीयावरही शेवंताच्या या लुकची चर्चा होत आहे.

या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे प्रसिद्ध पात्र कायम चर्चेत राहिलय. सोशल मिडीयावर तर या दोघांचे मिम्सही पाहायाला मिळतात. ही हटके जोडी प्रेक्षकांना पाहताना रंजक वाटली आणि आता त्यांच्या लग्नाचा हा भाग मालिकेत काय नवीन वळण घेऊन येणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
 
 
यातच माईने घरात हळदी कुंकवाचा घाट घातलाय, इतक्यात हातात हिरवाचुडा, कपाळावर मोठ्ठ कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारातउभी राहते, आणि सगळ्यांना धक्का बसतो, शेवंताने तिचा पण पूर्ण केलाआणि अण्णांशी लग्न केल पण तिला नाईकवाड्यात प्रवेश मिळेल कि ह्यामागे सुद्धा अण्णांचं काही कारस्थान आहे  हे  येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. तेव्हा अण्णा आणि शेवंताच्या या लग्नसोहळ्यात नेमकं काय घडतं आणि शेवंता नाईकांच्या वाड्ताय लग्न करून गेल्यानंतर ही मालिका काय वळण घेते या सगळ्या गोष्टी पाहणं मनोरंजनात्मक असेल एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive