'बाळूमामा'च्या सेटवर शेळ्यांसोबत सुमित पुसावळे असा घालवतोय वेळ, शेयर केले फोटो

By  
on  

इतर मालिकांप्रमाणे 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. सगळ्या सेटवर नियमांचे पालन करून चित्रीकरण केलं जात आहे. शिवाय पुन्हा चित्रीकरण सुरु झाल्याने आणि सेटवर परतल्याने मालिका कलाकारही आनंदी आहेत. अभिनेता सुमित पुसावळे  'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारत आहे. नुकतेच सुमितने  मालिकेच्या सेटवरील काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सुमित लिहीतो की, "अभिनय हे काहीतरी वेगळं असण नसतं तर जे वेगळं आहे त्यात सारखेपणँ शोधणं आणि मग त्यात मला शोधणं असतं" 

पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये सुमितसोबत सेटवरील शेळ्याही पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत निवांतवेळी वेळ घालवताना सुमित या फोटोंमध्ये दिसतोय.

या मालिकेतून सुमितला या मालिकेतून वेगळी ओळख मिळाली. शिवाय त्याला या भूमिकेमुळे फॉलो करणारा चाहतावर्गही तयार झाला आहे. 

 

Recommended

Loading...
Share