By  
on  

नागपंचमीच्या दिवशी या अभिनेत्रीने पोस्ट केले हे फोटो, म्हणते "आज मी खूप खुश आहे"

प्रेम पॉइजन पंगा या मराठी मालिकेत अभिनेत्री शरयु सोनावणे ही नागीणीच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील नागीण आणि मनुष्याचीही ही लव्ह स्टोरी पाहायला रंजक वाटते. मात्र नागपंचमीच्या दिवशी शरयुने तिच्या या भूमिकेमधील नागीण लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ती लिहीते की, "आज मी खूप खूप खूप खुश आहे.का??अहो का काय विचारता??आज माझा स्पेशल डे आहे कारण आज नागपंचमी आहे. कमाल आहे ना मनुष्य नागपंचमीच्या दिवशी आम्हाला नाग नागिणींना स्पेशल ट्रीटमेंट देतात म्हणजे आमची प्रार्थना करतात ,आम्हाला दूध लाह्यांचा नैवेद्य वाहतात ,आमची मनोभावे प्रार्थना करतात पण इतर वेळी आम्हाला बघताच घाबरून किळस करून आम्हाला का मारता??मी किंवा माझ्यासारखे इतर प्राणी कधीच कोणावर अटॅक करत नाहीत पण आमच्या जीवाला धोका आहे असं जेव्हा आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही वाचण्याचा प्रयत्न करत असतो जे तुम्ही ही करताच, प्राणी किंवा सरपटणारे प्राणी हे मुका जीव असतात, मग तुम्ही आम्हाला का घाबरता?माझी सगळ्यांना विनंती आहे की मुक्या प्राण्यांना मारू नका त्यांच्यावर प्रेम करा..हॅप्पी नागपंचमी"

lतिच्या या पोस्टमधून तिने मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश दिला आहे. तिचे या लुकमधील हे फोटो तिच्या चाहत्यांनाही आवडले आहेत. या लुकमधील तिचा हा अवतार मालिकेतही पसंत केला जात आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive