By  
on  

लोकप्रिय मालिका 'वहिनी साहेब' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाउनच्या काळात अनेक जुन्या मालिका प्रेक्षकांना पुन्हा पाहता आल्या. एकीकडे मालिकांचे जुने भाग पाहून प्रेक्षक कंटाळले होते त्यातच जुन्या मालिका पुन्हा प्रसारित झाल्याने पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. मात्र आता मालिकांचे चित्रीकरण सुरु झाल्याने नवे भाग प्रेक्षकांना पाहता येत आहेत. पण यातच जुनी लोकप्रिय मालिका ‘वहिनी साहेब’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या मालिकेत शरद पोंक्षे, सुचित्रा बांदेकर आणि भार्गवी चिरमुले यांच्यासह अनेक कलाकार झळकले होते. आणि आता पुन्हा ही मनोरंजनाची पर्वणी अनुभवण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळाली आहे.
सुचित्रा बांदेकर यांची या मालिकेतील भूमिका लक्षवेधी ठरली होती. 

 

‘वहिनी साहेब’ ही मालिका म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील सुनेची कथा आहे. घरातील सून जी आई, बहिण, मुलगी आणि विविध नात्यांमध्ये गुंतलेली असते. तिचा प्रवास, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींवर मात करणारी ती अशी ही मालिका आहे. विशेषकरून महिलांचा या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. आता ही मालिका भेटीला येत असल्याने प्रेक्षक पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये रमतील एवढं नक्की. ज्यांनी ही मालिका तेव्हा पाहिली नसेल त्यांनी पुन्हा पाहण्याची संधी मिळाली आहे. तेव्हा झी युवा वाहिनीवर 'झी क्लासिक' या खास सेगमेंटमध्ये २७ जुलै पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ४ ते ६ दोन तास ही मालिका पाहता येणार आहे.


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive