'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत नवी एन्ट्री, प्रेक्षकांसमोर येणार पिंकीचं खर रूप.

By  
on  

 सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत वेगळं कथानक असलेली माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. 'सुखी संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत सुरु झालेला या मालिकेचा प्रवास विविध वळणं घेताना दिसत आहे. यातच आता मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री होत आहे. 

एकीकडे राधिका आणि शनाया या गुरुनाथला धडा शिकवण्यासाठी एकत्र आल्या आहेत. तर दुसरीकडे गुरुनाथचा भांडाफोड करण्यासाठी दोघी पिंकी आणि चिंकी या नावाचे कोडवर्ड वापरुन एकमेकींना संपर्क करत आहेत. मायासमोर गुरुनाथचा खोटेपण सिद्ध करण्यासाठी दोघी प्रयत्न करत आहेत. मात्र गुरुनाथ हा पिंकीच्या शोधात आहे. आणि त्यासाठी तो मम्मा आणि केडीची मदत घेतो.

पण आता ही पिंकी कोण आहे हे देखील लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतच पिंकीची छोटीशी झलक दाखवणारे फोटो समोर आले आहेत. मात्र आता ही पिंकी कोण हे मालिकेच्या आगामी भागांमधून समोर येईल. 
 

Recommended

Loading...
Share