By  
on  

पाहा Photos : लष्करे कुटुंबात सिद्धीचा वाढदविस थाटामाटात साजरा

 'जीव झाला येडापिसा' ही मालिका आता वेगळ्या वळणावर आलेली पाहायला मिळतेय. एकीकडे आत्याबाईंनी शिवाशी अबोला कायम ठेवला आहे. तर त्यातच मालिकेत चंपा नावाचे नवे पात्रही आल्यानं मालिकेला एक वेगळीच कलाटणी मिळालेली पाहायला मिळतेय. हे सगळं घडत असतानाच शिवा मात्र कुटुंबासोबत मिळून सिद्धीला एक गोड सरप्राईज देताना दिसतोय.

सिद्धीच्या वाढदिवसानिमित्ताने लष्करे कुटुंब सिद्धीचा वाढदिवस थाटामाटात साजरा करत आहेत. यावेळी सिद्धीला खास सरप्राईज देण्यात आले आहे.

सिद्धीला देखील हे सरप्राईज प्रचंड आवडल्याचं पाहायला मिळतय.

तर दुसरीकडे  शिवा जेव्हा चंपाला लष्करेंच्या घरी आणतो तेंव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो ही बाई नक्की कोण आहे ? आणि तिचा आत्याबाईंशी नक्की काय संबंध आहे, पण जेंव्हा सिद्धी या विषयाच्या खोलात जाते तेंव्हा शिवा तिला बाजावून सांगतो आत्याबाई ते बघून घेतील आपला याच्याशी काही एक संबंध नाही आहे. सिद्धी आणि मंगल या दोघींच्या मनात हाच प्रश्न आहे, चंपाचे अचानक रुद्रायतमध्ये येण्याचे कारण काय आहे ? यामागे नक्की कोणत गूढ आहे ? हे सिध्दीला कळेल ? या मालिकेत पुढे काय होईल हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेलच.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive