प्रेक्षकांसाठी आता मनोरंजनाचा अधिकमास, लाडक्या मालिका आता रविवारीसुद्धा

By  
on  

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरात बसलेल्यांसाठी टेलिव्हिजनवरील विविध कार्यक्रम त्यांचं मनोरंजन करत आहेत. विशेषकरून विविध आवडत्या मालिका प्रेक्षक आवर्जुन बघतात. याचा मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांंसाठी आता मनोरंजनाचा अधिकमास येत आहे.

 

झी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका आता त्यांना या मनोरंजनाच्या अधिकमासात रविवारीसुद्धा पाहायला मिळणार आहेत. अनेक मालिका या सोमवार ते शुक्रवारी किंवा सोमवार ते शनिवार पाहता येतात. मात्र आता या मालिकांचा आस्वाद त्यांना रविवारीसुद्धा घेता येणार आहे. 

'होम मिनिस्टर', 'माझा होशील ना', 'तुझ्यात जीव रंगला', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'अग्गबाई सासूबाई', 'लाडाची मी लेक गं' या मालिका आता प्रेक्षकांना रविवारीसुद्धा पाहता येणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांची रविवारची संध्याकाळ ही आता मनोरंजनात्मक असणार आहे. येत्या 27 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान दर रविवारी प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीवर त्यांच्या या आवडत्या मालिका पाहता येणार आहेत.

Recommended

Loading...
Share