By Amruta Chougule | 11-Dec-2019

Birthday special: विनोदाच्या टायमिंगचा बादशहा अभिनेता भरत जाधव

अभिनेता भरत जाधव हे नाव डोळ्यासमोर आणलं तर अनेक धमाल विनोदी सिनेमे आणि नाटकं डोळ्यासमोरून जातात. विनोदाचं उत्तम टाईमिंग, अभिनयाची जाण, पडद्यावर असलेला उत्साही वावर अशा अनेक गुणांमुळे भरत आजही.....

Read More

By | 20-Oct-2018

 सोनी मराठीवर पाहा 'विनोदाचा बादशाह लक्ष्या'

तो आला, त्यांनी पाहिलं, आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यानं सगळ्यांना जिंकलं आणि तो निघूनही गेला... आजही ज्याच्या नसण्याची खंत कित्येक सिनेप्रेमींच्या मनात आहे, असा तो एकमेव 'लक्ष्मीकांत बेर्डे' म्हणजेच आपल्या सगळ्यांचा लाडका 'लक्ष्या'... दीड ते दोन दशकं सिनेसृष्टीत धुमाकूळ घालणार्‍या या विनोदाच्या बादशाहाची  एक्झीट सिनेरसिकांसाठी शॉकिंग होती... या कलाकाराला जाऊन तब्बल १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र लक्ष्याच्या पडद्यावर येण्यामुळे होणारा हास्यस्फोट आजही कायम आहे. २६ ऑक्टोबर १९५४मध्ये जन्माला आलेल्या आणि प्रेक्षकांशी अतूट नातं जोडणार्‍या या विनोदातल्या अवलियाच्या जन्मतिथीनिमित्त आदरांजली म्हणून, याबादशाहाचे सिनेमे आठवडाभर सोनी मराठी या वाहिनीवरून दाखवले जाणार आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेसाठी असलेल्या या विशेष कार्यक्रमाला 'विनोदाचा बादशाह लक्ष्या' हे नाव देण्यात आलं असून या दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डेंच्या धमाल सिनेमांची रंगत प्रेक्षक अनुभवू शकणार आहेत. २२ ऑक्टोबरपासून २७ऑक्टोबरपर्यंत रोज दुपारी३ वाजता प्रेक्षक आपल्या लाडक्या लक्ष्याच्या काही अजरामर कलाकृती पाहू शकणार आहेत. यात 'एकापेक्षा एक''चिकट नवरा' 'रंग प्रेमाचा', 'लपवा छपवी' 'इजा, बिजा, तिजा' आणि 'बजरंगाची कमाल'या सिनेमांचा समावेश आहे. गेली दोन दशकं प्रेक्षकांचं लक्ष्यावरचं प्रेम किंचितही कमी झालेलं नाही... ‘धूमधडाका’ या चित्रपटातून मराठी चित्रपटविश्वात पाऊल ठेवलेल्या लक्ष्यानं मराठी सिनेसृष्टी गाजवली. याचा प्रभाव एवढा होता की , लक्ष्याच्या हिंदीपदार्पणावेळी ‘लक्ष्या आला रे...!’ चा डंका पिटण्यात आला होता. मराठी हिंदी विनोदी नटांना पुरून उरलेल्या अशा लक्ष्याचे चित्रपट सोनी मराठीवर पाहता येणार आहेत. तेव्हा रसिकांना हसवण्याचा विडा उचललेल्या लक्ष्याच्या जन्मतिथीनिमित्त आपल्या लाडक्या लक्ष्याच्या अजरामर कलाकृतींचा आस्वाद घ्या २२ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबरमध्ये फक्त सोनी मराठीवर........

Read More