By  
on  

Birthday special: विनोदाच्या टायमिंगचा बादशहा अभिनेता भरत जाधव

अभिनेता भरत जाधव हे नाव डोळ्यासमोर आणलं तर अनेक धमाल विनोदी सिनेमे आणि नाटकं डोळ्यासमोरून जातात. विनोदाचं उत्तम टाईमिंग, अभिनयाची जाण, पडद्यावर असलेला उत्साही वावर अशा अनेक गुणांमुळे भरत आजही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. करीअरच्या सुरुवातीला भरत शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा यांच्यासोबत काम केलेला भरत शाहीर साबळे यांना गुरु मानतो. 

केदार शिंदे या जीवलग मित्रासोबत त्याने नाटकांमधून कामं केली. पण त्यात पुरेसे पैसे मिळत नाटकांची आवड जपत जपत भाजी विक्रीचा व्यवसायही केला. पण त्यात मन न रमल्याने सगळ्याला राम राम ठोकत सिनेमांची वाट धरली. 
'अगबाई अरेच्चा', 'सत ना गत', 'नो एंट्री', 'श्रीमंत दामोदरपंत', 'जत्रा', 'फक्त लढ म्हणा', 'रिंगा रिंगा', 'शिक्षणाच्या आयचा घो', 'साडे माडे तीन', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'पछाडलेला' या आणि अशा कितीतरी सिनेमांची नावं समोर येतात. याशिवाय हसाच कट फू, साहेब बिबी आणि मी, आली लहर केला कहर या मालिकांमधून तो आपल्याला भेटला आहे.  

पण भरत ख-या अर्थाने खुलला ते रंगभूमीवर. कितीही झगमगाट अवती भवती असला तरी खरा कलाकार रंगभूमीशी असलेलं इमान कायम राखतो. भरतने हेच केलं. त्यामुळेच 'ऑल द बेस्ट', 'सही रे सही', 'श्रीमंत दामोदरपंत', 'पुन्हा सही रे सही' या नाटकांमधील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.


 

Recommended

PeepingMoon Exclusive