By | 31-May-2019

सिनेसृष्टीत ५५ वर्षांपेक्षाही अधिक काळ कार्यरत असलेले अभिनेते रमेश मेढेकर कालवश

मराठी सिनेसृष्टीत ५५ वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचं नुकतंच निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. ते संंपुर्ण हयात अभिनयक्षेत्राशी निगडीत होते. त्यांनी थिएटर अकादमी, पुणे या.....

Read More

By | 22-Feb-2019

‘ती फुलराणी’ मालिकेत होणार, एका ज्येष्ठ कलाकाराची एंट्री पाहा कोण आहेत हे अभिनेते

श्रीमंत घराणं असलेलं देशमुख कुटुंब कसं आहे, किती भिन्न स्वभावाचे व्यक्ती त्या कुटुंबात राहतात याची कल्पना प्रेक्षकांना आलीच आहे. मंजूच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी प्रत्येकवेळी अडचणी उभ्याकेल्या, तिला कमी लेखलं, तिचा अपमान केला याविषयी नाराजी आणि राग मंजूच्या मनात नक्कीच असणार. आता या मालिकेत अशा एका नवीन व्यक्तीची एण्ट्री होणार आहे ज्याला श्रीमंत, भांडवलशाहीवृत्तीच्या माणसांबद्दल अतिशय तिटकारा आहे आणि विशेष करुन देशमुख कुटुंबाबद्दल प्रचंड संतापही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जगदीश महापात्रे’.

वय सत्तरीच्या आसपास असलेले, रुबाबदार, देखणं व्यक्तीमत्त्व, बुद्धीमान असलेल्या जगदीश महापात्रे ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी साकारली आहे. जगदीश महापात्रे यांनीमानववंशशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे, माणसांचा, राहणीचा, संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे.

 

ते जरी हुशार असले तरी त्यांचा स्वभाव फार विचित्र आहे. कधी काय विचार करतील, काय बोलतीलयाचा नेम नाही. इतकेच नव्हे तर बेधडकपणे बोललो, वागलो तर समोरच्याला काय वाटेल याचा विचारही ते करत नाही. बाहेरुन कितीही कडक वाटले तरी ते मनाने संवेदनशील आहेत. हुशार, स्वतंत्र, स्वाभिमानी माणसांबद्दल त्यांना  आदर आहे. असं असूनही त्यांना लहानपणापासून त्यांच्या आईकडून एकच वाक्य ऐकू आलंय की, देशमुखांमुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले, त्यामुळे त्यांचा देशमुखकुटुंबावर अजूनही राग आहे. पण देशमुखांशी त्यांचा संबंध काय, त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे याचा शोध लवकरच शौनक आणि मंजू घेणार आहेत.

.....

Read More

By | 09-Feb-2019

मंजू-शौनक संसारात आलेल्या संकटाला कसे सामोरे जाणार पाहा ‘ती फुलराणी’

मंजू-शौनकच्या नव्या नात्यातला गोडवा ताजा असतानाच अनेक संकटं त्यांच्यापुढे येऊन उभी ठाकली आहेत. घरच्यांचा विरोध पत्करून या दोघांनी लग्न केलं खरं पण देशमुख कुटुंबाने अजून मंजूला घरची सून म्हणून स्विकारलेलं.....

Read More