मराठी सिनेसृष्टीत ५५ वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश मेढेकर यांचं नुकतंच निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. ते संंपुर्ण हयात अभिनयक्षेत्राशी निगडीत होते. त्यांनी थिएटर अकादमी, पुणे या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या रंगमंच कारकिर्दीची सुरुवात भालबा केळकर यांच्या सानिध्यात केली. त्यावेळी वेडा कुंभार, देवांचे मनोराज्य, देव चालले, या नाटकात त्यांनी अभिनय केला. थिएटर अकादमीच्या स्थापनेनंतर त्यांनी घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, तीनपैशाचा तमाशा, बेगम बर्वे या नाटकातून केलेल्या अभिनयाला रसिकांनी पसंतीची पावती दिली.
https://twitter.com/sonymarathitv/status/1134126334861500416
अनेक मराठी सिनेमातून त्यांनी चरित्र भूमिकाही केल्या. त्यानंतर त्यांनी ‘इंडियन मॅजिक आय’ या संस्थेद्वारे अनेक दूरदर्शन मालिकांमधून काम केले. सध्या ते सोनी मराठीवरील ‘ती फुलराणी’ मालिकेत काम करत होते. त्यांच्यामागे एक मुलगा, एक मुलगी सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पीपिंगमूनकडून त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली...