पुन्हा ओटीटीवर झळकणार रिंकू राजगुरु, दिसणार या हिंदी सिनेमात

By  
on  

'सैराट'सह विविध मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता अभिनेत्री रिंकू राजगुरु ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवताना दिसतेय. 'हंड्रेड' या वेबसिरीजनंतर आता रिंकू ओटीटीवर पुन्हा एक नव्या सिनेमासह दिसणार आहे. 'अनपॉज्ड' या सिनेमात रिंकू झळकणार आहे.

हा सिनेमा पाच शॉर्ट फिल्म्सची एंथोलॉजी आहे. या सिनेमासाठी राज एंड डीके, निखिल आडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरु आणि नित्या महरातो यांनी हे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. या पाचपैकी 'रैट ए टैट' या शॉर्ट फिल्ममध्ये रिंकू झळकणार आहे. ज्यात रिंकू अभिनेत्री लिलेट दुबेसोबत झळकेल. या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन तनिष्ठा चॅटर्जीने केलं आहे. रिंकू या सिनेमात कोणत्या भूमिकेत दिसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर 8 डिसेंबर रोजी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. येत्या 18 डिसेंबरला हा सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होईल. मुख्य म्हणजे या सिनेमाचं चित्रीकरण लॉकडाउनच्या काळात महाराष्ट सरकारच्या नियमांचं पालन करून करण्यात आलं होतं. 

 

लॉकडाउनच्या काळात रिंकू 'हंड्रेड' या वेबसिरीजमध्ये झळकली होती. या सिरीजमधील रिंकूच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. या सिरीमध्ये रिंकू अभिनेत्री लारा दत्तासोबत झळकली होती. आणि आता ओटीटीवर रिलीज होणाऱ्या 'अनपॉज्ड' या सिनेमात रिंकूचं काम पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना असेल एवढं नक्की.

Recommended

Loading...
Share