'नेटफ्लिक्स इंडिया' ने केली यावर्षीच्या फिल्म्स, वेब सिरीज आणि कार्यक्रमांची घोषणा, माधुरीच्या 'फाइंडिंग अनामिका' ते तापसीची 'हसीन दिलरुबा', पाहा लिस्ट

By  
on  

नुकतच नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या स्ट्रीमिंग साईटवर 2021 मधील कम्प्लीट स्लेटची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सवर यावर्षी फिल्म्स, वेब सिरीज आणि कार्यक्रम मिळून एकूण 41 टायटल्स रिलीज केले जाणार आहेत. ज्यात रिची मेहताची 'दिल्ली क्राइम सीजन 2', 'जामताड़ा 2', 'कोटा फैक्ट्री 2', 'ये काली काली आंखें', मिसमैच्ड सीजन 2, 'लिटिल थिंग्स सीजन 3' आहेत. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आणखी बऱ्याच सिरीज आणि फिल्म्स रिलीज होणार आहेत. याशिवाय कपिल शर्माचा मोस्ट अव्हेटेड वेब शो आणि सान्या मल्होत्राची फिल्म सुद्धा नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. याशिवाय  'फाइंडिग अनामिका' पासून 'द फैबुलस लाइट्स ऑफ बॉलीवुड वाइव्स 2' सोबत 'धर्मेटिक' चे पाच शो आणि फिल्म्स यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 

नेटफ्लिक्स इंडियाने अपकमिंग प्रोजेक्ट्सची घोषणा करत लिहीलय की, "नवीन फिल्म्स, सिरीज, डॉक्युमेंट्री, रिएलिटी शो, कॉमेडी स्पेशल्स आणि बरच काही.. कारण हे सगळं येणार आहे.. 2021 मध्ये स्ट्रीम करण्यात येणार आहे."

 फिल्म्स: 
1. अजीब दास्तान- 

निर्माते: करण जौहर, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा, धर्मिक मनोरंजन. 

दिग्दर्शक: शशांक खेतान, राज मेहता, नीरज घायवान, कायज़े ईरानी. 

लेखक: शशांक खेतान, सुमित सक्सेना, नीरज घायवान, उज़मा खान. 

कास्ट: फातिमा सना शेख, जयदीप अहलावत, अरमान रल्हन, नुसरत भरुचा, अभिषेक बनर्जी, इनायत वर्मा, कोंकणा सेन शर्मा, अदिति राव हैदरी, शेफाली शाह, मानव कौल, तोता रॉय चौधरी. 

 

2. बुलबुल तरंग- 
निर्माते:: रिलायंस एंटरटेनमेंट

दिग्दर्शक: श्री नारायण सिंह

लेखक: अरशद सईद

कास्ट: सोनाक्षी सिन्हा, ताहिर राज भसीन

सिनेमाची कहाणी बुलबुल नावाच्या एका युवतीची आहे जिचं स्वप्न आहे की तिचा पति ऋषि कुमार हा तिच्या बारातीत घोड्यासोबत यायला पाहिजे. बुलबुल तिच्या अधिकारांसाठी लढताना पाहायला मिळेल.

3. धमाका- 
निर्माते: आरएसवीपी, राम माधवानी फिल्म्स, रॉनी स्क्रूवाला, राम माधवानी, अमिता माधवानी

दिग्दर्शक: राम माधवानी

लेखक: राम माधवानी, पुनीत शर्मा

कास्ट: कार्तिक आर्यन, मृणाल ठाकुर, अमृता सुभाष, विकास कुमार, विश्वजीत प्रधान

सिनेमात कार्तिक एक न्यूज एंकरच्या भूमिकेत दिसेल. तो एका बॉम्बस्फोटाच्या स्थितीत अडकतो ज्यामुळे त्याच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येतो.  

4. हसीन दिलरुबा- 
निर्माते: टी-सीरीज़, कलर येलो प्रोडक्शंस, आनंद एल राय

दिग्दर्शक: विनिल मैथ्यू

लेखिका: कनिका ढिल्लन

कास्ट: तापसी पन्नू, विक्रांत मैसी, हर्षवर्धन राणे

आनंद एल राय के प्रोडक्शनमध्ये बनलेल्या या सिनेमात तापसी पन्नू विक्रांत मेस्सीसोबत दिसेल. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे हंसी तो फंसी सिनेमाचे दिग्दर्शक विनिल मैथ्यू यांनी. ही एक रहस्यमयी हत्येच्या भोवती फिरणारी एक रोमँटिक थ्रिलर कथा आहे. 

5. जादूगर 
निर्माते: पॉशम पीए पिक्चर्स

दिग्दर्शक: समीर सक्सेना

लेखक: बिस्वपति सरकार

कास्ट: जितेंद्र कुमार, अरुशी शर्मा

जादू मीनू, मध्य प्रदेशमधील नीमचमध्ये एक छोटासा जादूगार असतो. त्याला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी एक स्थानीक फुटबॉल टुर्नामेंट जिंकायची असते.    

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

 

नेटफ्लिक्सच्या इतर फिल्म्सची लिस्ट :
फिल्म्स 

- माइलस्टोन 
- द डिस्सीप्लीन 
- जगमे थंडीराम 
- अजीग दास्तांस - मीनाक्षी सुंदरेश्वर 
- नवरस
- पगलैट 
- पेंटहाउस 
- सरदार का ग्रैंडसन 

सीरीज 
- अरण्यक 
- बॉम्बे बेगम्स 
- डिकपल्ड 
- दिल्ली क्राइम सीजन 2 
- फील्स लाइक इश्क 
- फाइंड‍िंग अनामिका 
- जामताड़ा सीजन 2 
- कोटा फैक्ट्री सीजन 2
- लिटिल थ‍िंग्स सीजन 4 
- माई 
- मसाबा मसाबा सीजन 2 
- मिस्मैच्ड सीजन 2 
- रे 
- SHE  सीजन 2 
- ये काली काली आंखें 

कॉमेडी स्पेशल्स 
- कॉमेडी प्रीमियम लीग 
- कप‍िल शर्मा 

अन्य स्पेशल्स 
- सुमुखी सुरेश 
- आकाश गुप्ता 
- राहुल दुआ 
- प्रशस्ती सिंह 

डॉक्यूमेंट्रीज 
- क्राइम स्टोरीज- इंड‍िया ड‍िटेक्ट‍िव 
- हाउस ऑफ सीक्रेट्स- द बुराड़ी डेथ्स 
- इंड‍ियन प्रीडेटर 
- सर्च‍िंग फॉर शीला 

रियलिटी सीरीज
- फैबुलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइफ्स सीजन 2 
- सोशल करेंसी 
- द बिग डे कलेक्शन सीजन 2  

Recommended

Loading...
Share