पाहा Video : मनोज वाजपेयीचा 'द फॅमिली मॅन' येणार 4 जूनला, नव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित

By  
on  

अभिनेता मनोज वायपेयीच्या  'द फॅमिली मॅन' या सिरीजच्या नव्या सीझनच्या अनेकांना उत्सुकता होती. यातच आता नव्या सीझनची घोषणा करण्यात आली असून ट्रेरलही प्रदर्शित करण्यात आलाय. अमेझॉन प्राईम व्हिडीओजने राज व डीके यांची निर्मिती असलेला या सिरीजच्या नव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 4 जून, 2021 रोजी सिरीज प्रदर्शित होणार आहे.

 ही लक्षणीय घोषणा करत अमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकतच 'फॅमिली मॅन' ऊर्फ श्रीकांत तिवारीच्‍या पुनरागमनाचा लक्षवेधक ट्रेलर सादर केला आहे. अभिनेता मनोज वाजपेयीने ही भूमिका साकारली आहे. या सीझनमध्‍ये श्रीकांत तिवारी नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. सामंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे. या थ्रिलर सिरीजच्‍या 9 भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन व जागतिक दर्जाचा गुप्‍तचर अशा दुहेरी भूमिका साकारताना आणि देशाचे घातक हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करताना पाहायला मिळणार आहे. रोमांचपूर्ण ट्विस्‍ट्स आणि अनपेक्षित क्‍लायमॅक्‍स असलेल्‍या या ऍक्शन-ड्रामाने भरलेल्‍या सिरीजचा आगामी सीझन श्रीकांतच्‍या दुहेरी विश्‍वांची लक्षवेधक झलक दाखवेल. 

 याविषयी या सिरीजचे निर्माते राज आणि डीक सांगतात की, ''निर्माते म्‍हणून आम्‍ही आज 'दि फॅमिली मॅन'च्या बहुप्रतिक्षित सीझनचा ट्रेलर शेअर करण्‍यासाठी दीर्घकाळापासून वाट पाहत आलो आहोत. आम्‍ही खात्री देतो की, हा सीझन यंदाच्‍या उन्‍हाळ्याच्‍या शेवटपर्यंत सादर होईल. आम्‍ही आमचे वचन नेहमीच पाळले आहे, ज्‍याचा आम्‍हाला आनंद होत आहे. हा प्रतिक्षाकाळ अखेर 4 जून रोजी समाप्‍त होईल. श्रीकांत तिवारी थरारक पटकथेसह परतत आहे आणि 'नवीन चेह-याच्‍या रूपात धोका येत आहे' – सामंथा अक्किनेनी, जिने उत्तम कामगिरी बजावली आहे. सोबतच प्रतिभावान कलाकार देखील आहेत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, महामारीदरम्‍यान काम करावे लागले असले तरी आम्‍ही तुम्‍हा सर्वांसाठी रोमांचक सीझनची निर्मिती केली आहे. आशा करतो की, नवीन सीझन अद्वितीय ठरेल. हा अत्‍यंत अवघड काळ आहे आणि आम्‍ही लवकरच सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा व्‍यक्‍त करण्‍यासोबत प्रार्थना करतो. कृपया सुरक्षित राहा, मास्‍क घला आणि लवकरात लवकर लस घ्‍या.''   

पुरस्‍कार-प्राप्‍त या अमेझॉन ओरिजिनल सिरीजमध्‍ये दक्षिणेची सुपरस्‍टार सामंथा अक्किनेनीचे डिजिटल पदार्पण होत आहे.  पद्मश्री पुरस्‍कार-प्राप्‍त मनोज वाजपेयी, प्रियामणी, यांच्यासोबत शरिब हाश्‍मी, सीमा बिस्‍वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्‍वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्‍हा आणि महक ठाकूर हे कलाकार या सीझनमध्ये झळकतील. या सोबतच तामिळ चित्रपटसृष्‍टीमधील नावाजलेले मिमे गोपी, रविंद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंद सामी आणि एन. अलगमपेरूमल हे देखील यात असणार आहेत.

Recommended

Loading...
Share