या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्येही झळकणार अमेय वाघ, चित्रीकरणाला सुरुवात

By  
on  

'असूर' या हिंदी वेबसिरीजमधून पौराणिक कथेचा पाया असलेला थरार पाहायला मिळाला. आणि आता लवकरच या सिरीजचं दुसर पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणाच प्रतिसाद मिळाला होता. 

या सिरीजमधील अभिनेता अमेय वाघची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली होती. अमेयने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं होतं. अमेयसह या सिरीजमध्ये बरुन सोबती, अरशद वारसी आणि रिद्धि डोगरा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता दुसऱ्या सिझनमध्येही ही कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. जिथे पहिल्या सिझनची कहाणी संपली होती त्याच्यापुढे काय होणार हे दुसऱ्या सिझनमध्ये पाहायला मिळेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by amey wagh (@ameyzone)

नुकतच 'असूर 2' च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

अमेयने या सिरीजच्या दुसऱ्या सिझनच्या मुहूर्ताचा फोटो सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या फोटोत अमेयच्या हातात क्लॅपबोर्ड पाहायला मिळतोय. याशिवाय अरशद वारसी आणि रिद्धिने देखील सोशल मिडीयावर चित्रीकरण सुरु झाल्याची पोस्ट केली होती. 

या सिरीजमधील अमेयची रसूल ही भूमिका लक्षवेधी ठरली होती. आता दुसऱ्या सिझनमध्येही अमेय झळकणार आहे. तेव्हा दुसऱ्या सिझनमध्ये काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share