नावजुद्दीन सिद्दीकीच्या ‘सेक्रेड गेम्स-2’ चा पाहा टीझर; उलगडणार अनेक रहस्य

By  
on  

‘सर जी आपके पास सिर्फ 25 दिन है…..बचालो मुंबई को’ असं म्हणत धडाकेबाज गणेश गायतोंडे उभा करणारा नवाजुद्दीन सिध्दीकीच्या सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांना या वेबसिरीजचा पहिला भाग इतका आवडलाय की ते दुस-या भागाची आतुरतेने वाट पाहात होते. या दुस-या भागाचा टीझर लॉंच झाला असला तरी त्यातून पुढे नेमकं काय घडणार याचा अजिबातच अंदाज येत नाही. यात फक्त संपूर्ण स्टारकास्टचे आवाज ऐकू येत आहेत. पण ब-याच रहस्यांचा उलगडाया सीझन 2 मध्ये होणार एवढं मात्र नक्की!

नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन आज ‘सेक्रेड गेम्स 2’ चा टिझर प्रदर्शित करण्यात आला. 45 सेकंदाच्या या टीझरमध्ये फक्त स्टारकास्टचे आवाजच ऐकू येत असले तरी गणेश गायतोंडे ही नवाजुद्दीनने साकारलेली व्यक्तिरेखा पुन्हा हटके स्वरुपात पाहायला मिळणार याची कल्पना येतेय. तुम्हाला माहितच आहे, पहिल्या भागात नवाजुद्दीनच्या या व्यक्तिरेखेचा मृत्यू झाला असून मध्ये मध्ये हा सिनेमा त्याची कहाणी फ्लॅशबॅकमध्ये सांगतो. सेक्रेड गेम्सचा हा पहिला सीझन 8 एपिसोड्सचा होता.

‘बिच्छु हैं अपनी कहानी चिपक गयी है आपको!’ असं पहिल्या सिझनमध्ये म्हणणा-या नवाजुद्दीनसोबतच सिनेमात सैफ अली खान, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, सुरवीन चावला, नीरज काबी, कुब्रा सेट, शालिनी वत्स अशा अनेक कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला.

गाजलेल्या या वेबसिरीजचा ‘सेक्रेड गेम्स 2’ या दुस-या सीझनकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. ‘इस बार तो भगवान खुदको भी नहीं बचा सकता!’ या नव्या संवादाने टिझर पाहण-यांमध्ये सर्वत्र उत्सुकता निर्माण केली आहे. विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांचे दिग्दर्शिन असलेल्या ‘सेक्रेड गेम्स’चा हा दुसरा सीझन कसा असणार, प्रेक्षकांना आवडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Recommended

Share